शमीच्या खोडापासून तयार केलेली पुण्यातील एकमेव मूर्ती हत्तीवर विराजमान

Ganpati Visarjan 2024 | लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सध्या सज्ज झालेत. सकाळी दहा वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्यात सध्या बाप्पाची एक मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे.
पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सव रोखेला सुरुवात झाली आहे. पुण्यातील त्वष्टा कासात मित्रमंडळाले यंदा मिरवणुकीसाठी कोणताही रथ किंवा महाल उभा केला नाही. तर केरळवरून हत्ती आणला आहे. हा हत्ती नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. केरळचा हत्ती पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. याच हत्तीच्या पाठीवर शमीच्या खोडापासून तयार करण्यात आलेली बाप्पाची मुर्ती विराजमान करण्यात आली आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.





