येळकोट…येळकोट जय मल्हार…! पुण्यात अवतरले श्री खंडेराय…
Updated On:

Ganpati Visarjan 2024 | पुण्याची गणपती मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. त्यासोबतच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांचे खास आकर्षण पुणेच नाही तर राज्यभरातील गणेश भक्तांना आहे.
दरम्यान, आता पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी चा जिवंत देखावा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी ने यंदा मल्हारी मार्तंड याची थीम साकारली आहे. गेल्यावर्षी त्यांनी शिव थीम साकारली होती.
त्यातच ज्यांनी या मल्हार मार्तंड श्री खंडेरायाची भूमिका साकारली आहे त्यांनी आजच्या 5 तासाच्या मिरवणुकीसाठी तब्बल 3 महिने सराव केला असल्याचे सांगितले.
टॅग्स:





