सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणपती आरती

पुणे – करोनामुळे यंदा गणपती बाप्पाचे स्वागत साधेपणाने करण्यात आले. या करोनाकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासन आणि महत्त्वाचे सफाई कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक व्हावे, आज हेच नागरिकांचे देव बनले असून, अशा देवमाणसांच्या हस्ते गणपती बप्पांची आरती करण्याचा उपक्रम अनेक गणेशमंडळांनी राबविला. त्यामध्ये कर्वेनगर येथील मोरया मित्र मंडळाने पहिल्याच दिवशी सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करून त्यांचा सन्मान केला.
मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांच्या वतीने आरोग्य सेवक आणि कर्मचारी यांना मास्क, हॅन्डगोव्होज आणि सेनिटायझर बॉटल देवून सत्कार केला.
मागील आठ दिवसांत डॉक्टर, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक, वृत्तपत्र विक्रेते यांच्या हस्ते दररोजची आरती करण्यात येत आहे. यावेळी मंडळाचे विनायक भरम, मंगेश नवघणे, निलेश भास्कर, हर्षद साकळे, अजित देशमुख उपस्थित होते.





