Gangster Sharad Mohol murder case: आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी
Updated On:

पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरून मुन्ना पोळेकरच्या नावाच्या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, तर याच्याच नावाने शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळची त्याच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या संपुर्ण प्रकरणानंतर शरद मोहोळची पत्नी माध्यमांसमोर आली होती.





