गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचा भावाला म्हणजेच अनमोल बिश्रोईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नईला अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सरकार अनमोल बिश्नोईला भारताच्या स्वाधीन करणार आहे. प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आला आहे. भारत सरकारकडून अनमोल बिश्नोईला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनमोल बिश्रोईला भारतात आणल्यानंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता, या प्रकरणात अनमोल बिश्नोई वॉन्टेड आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा समावेश मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीमध्ये करण्यात आला होता.