टोळीयुद्धातील गोळीबारात जखमी झालेल्या गुंडाच्या अंगरक्षकाचा मृत्यू

पुणे(प्रतिनिधी) : लोणीकाळभोरमधील टोळीयुद्धातील बेछुट गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड संतोष जगताप याच्या अंगरक्षकाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वाळू उपसा ठेकेदारीतील वर्चस्व तसेच वैमनस्यातून लोणीकाळभोरमध्ये झालेल्या टोळीयुद्धातून गुंड संतोष जगताप याच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला होता.
अश्विनीकुमार उर्फ मोनूसिंग अरूणकुमार सिंग (वय ३५) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
गेल्या महिन्यात २२ ऑक्टोबर रोजी गुंड संतोष जगताप आणि त्याच्याबरोबर असलेले दोन अंगरक्षक सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन परिसरात एका उपाहारगृहात गेले होते.
त्या वेळी प्रतिस्पर्धी टोळीतील हल्लेखोरांनी उपाहारगृहातून बाहेर पडणाऱ्या जगताप आणि त्याच्याबरोबर असलेल्या अंगरक्षकांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्त्युतरादाखल अंगरक्षकांनी हल्लेखोरांवर पिस्तुलातून गोळीबार केला. दोन्ही बाजूंकडून बेछुट गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात एक हल्लेखोर आणि जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.





