पुणे : गंगोत्री होम्स बांधकाम क्षेत्रात फक्त व्यवसाय करत नसून ग्राहकांनाही आपल्या व्यवसायाशी जोडून घेत आहे. मराठी व्यावसायिकांनी गंगोत्री होमस्च्या माध्यमातून केलेली प्रगती स्पृहणीय आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प उभे करून समव्यावसायिकांना गंगोत्री होम्सनेनवी दिशा दाखविली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी काढले.
पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या गंगोत्री होम्सतर्फे ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 3.0’ हर्षल बॅक्वेटस् कर्वे रोड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. फेस्टिव्हल अंतर्गत गंगोत्री परिवारातील ग्राहक व सुहृदांचा वार्षिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सुहास पटवर्धन यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी पटवर्धन बोलत होते.
गंगोत्री होम्सचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि मकरंद केळकर उपस्थित होते. ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 3.0’ शनिवार, दि. 7 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुला आहे.
गंगोत्री होमस्च्या बांधकाम क्षेत्रातील कार्याचे कौतुक करून सुहास पटवर्धन म्हणाले, गृहप्रकल्पांच्या माध्यमातून गंगोत्री होम्सने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गंगोत्री होम्सने भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करावा, अशा शुभेच्छाही दिल्या.
गंगोत्री होम्स परिवारात नव-नव्या गृहप्रकल्पांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सभासदांचा प्रातिनिधीक सत्कार पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला आहे. समाधानी ग्राहकांनी गंगोत्री होम्सच्या पारदर्शक व्यवसायाचे कौतुक केले.
सुहास पटवर्धन यांचा सत्कार गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि मकरंद केळकर यांनी केला. सुरुवातीस गणेश जाधव यांनी गंगोत्री होम्सच्या पुण्यातील गृहप्रकल्पांची माहिती दिली तर राजेंद्र आवटे यांनी सेंकड होम्सची संकल्पना विस्तृतपणे मांडली. मकरंद केळकर यांनी आभार व्यक्त करताना ग्राहकांच्या भावना जपत असल्याचे सांगितले.