Philippines cybercrime : फिलिपीन्समध्ये सायबर गुन्हेगारांची टोळी जेरबंद

Philippines cybercrime । फिलिपीन्समधील अधिकाऱ्यांनी ऑनलाईन गेमिंग आणि सायबर घोटाळ्याच्या एका केंद्रावर छापा घालून तब्बल १६० संशयित सायबर गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुसंख्या चिनी आणि इंडोनेशियाचे नागरिक आहेत.
हे सर्व इंटरनेटवर आधारीत गुन्हे करत होते असा प्रशासनाचा संशय आहे. फिलिपीन्सचे १०० सरकारी अधिकाऱ्यांनी लष्करी गुप्तचरांच्या मदतीने मध्य प्रांतातल्या लापू-लापू शहरातल्या एका कॉम्प्लेक्सवर हा छापा घातला. फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड माक्रोस ज्युनिअर यांनी चिनी गेमिंग कंपन्ययांवर जुलै महिन्यात बंदीचे आदेश दिले आहेत.
फिलिपीन्सच्या सायबर कायद्यांकडे दुर्लक्ष करून चिनी गेमिंग उद्योग चालवला जातो. आणि आर्थिक घोटाळे, मानवी तस्करी, छळ, अपहरण आणि खून यासह इतर गुन्हे देखील केले जात असल्याचा आरोप अध्यक्ष मार्कोस यांनी केला आहे.





