गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
‘हा’ निर्णय घेण्यात आला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही कोकणवासीयांना टोलचा त्रास सहन करावा लागणार नाही.
स्पीकर लावण्यास दिली परवानगी
गणेशोत्सवात मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सूट देण्यात आली आहे. दुसरा दिवस, पाचवा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी देण्यात येणार आहे.





