Ganesh Visarjan 2024 । पुण्याच्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे विसर्जन ; भाविकांची मोठी गर्दी

Ganesh Visarjan 2024 । पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे विर्सजन झाले आहे. पुण्याच्या पतंगा घाटावर आरती करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35 मिनिटांनी झाले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस सकाळी १० वाजता मंडई येथून सुरूवात झाली. पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक निघाली होती. ढोल -ताशाच्या गजरात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती . पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक विसर्जन घाटापर्यंत पोहचली.
दरवर्षी वेळेत मिरवणूक संपवतो, याही वर्षी लवकर संपवण्यासाठी मिरवणूक लहान करत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी जाहीर केले होते.
नगारखाना, गायकवाड यांचे सनईवादन, देवळणकर बंधूचे चौघडा वादन हे परंपरेप्रमाणे सहभागी झाले. तसेच रमणबाग, रुद्रगर्जना, परशुराम ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणुकीला आणखी बहर आणला.



