Ganesh Jayanti 2025 : गणेश जन्म सोहळ्यानिमित्त ‘श्री विघ्नहर गणपती’ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी !

ओझर : अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत श्री विघ्नहाराचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ४.३० वाजता मंदिर उघडण्यात येऊन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, शिल्पा जगदाळे व ग्रामस्थ यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
ठीक ७.३० वा. महाआरती संपन्न झाली. जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभ दिनी महाआरतीचा मान गणेशभक्त रवीकिरण शेंडगे, प्रसाद घेगडे, मुकुंदराज वाघ, अमित पद्मावार, निखील शेळके, समीर गुद्दये, महादेव वाघ यांना मिळाला. तिथी माघ शु ४ चतुर्थी वार शनीवार दि.१ रोजी सकाळी ९ ते १२.०० वा. चौथा उत्तरद्वार अंबेराई ओझर (जगदाळे मळा) पृथ्वी- सूर्य पूजा करून संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ व श्री विठ्ठल प्रसार्दिक भजन मंडळ सहभागी झाले होते.
श्री विघ्नहराच्या पालखीचे स्वागत फुलाची उधळन करुन स्थानिक ग्रामस्थ यांनी केले. ठीक १०.३०. वा. श्री विघ्नहराच्या पालखीचे प्रस्थान अंबेराई मंदिरात झाले. मंदिरामध्ये गेल्यानंतर धार्मिक विधी संपन्न करून ठीक ११.०० वा. पालखी श्री क्षेत्र ओझर च्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले ठीक .११.४५ मानटांनी पालखीचे मंदिरात आगमन झाले.
मंदिरात मोरया गोसावीच्या पदांचे गायक होऊन कीर्तनकार ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील,आळंदी यांचे देवजन्माचे कीर्तन संपन्न झाले. विघ्नहर्त्या गणरायाचे मंदिर गाभारा, आवार आणि मंदिरा बाहेरील परिसरातील गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषामूळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. ग्रामस्थ, देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले.
देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव, शिल्पा जगदाळे यांनी सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते. गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाच्या नोमघोषात दुपारी १२.३० वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर आरती घेण्यात आली.





