चिंबळीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘सीता स्वयंवर’ जिवंत देखावा; बाप्पाला भावपूर्ण निरोप

चिंबळी – चिंबळी (ता. खेड) येथील परिसरात मोठ्या आनंदमय वातावरणात तसेच शांतेत गणेश विसर्जन पार पडले. येथील शिव प्रतिष्ठाण सलग्न नवमहाराष्ट्र मित्र मडाळांने यावर्षी 37 वर्षात प्रर्दापण करत गणेश मूर्तीची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करून गेले आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. 9 व्या दिवशी विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘सीता स्वयंवर’ हा जिवंत देखावा सादर करून पारंपारिक पध्दतीने ढोल ताशाच्या भव्य गजरात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक पाहण्यासाठी गाव परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रेमाणे पद्मावती तरुण मंडळ, भैरवनाथ गणेश मित्र मंडळ, राजे शिव छत्रपती, हनुमान तरुण मंडळ आदि गणेश मडाळांच्या वतिने वतीने, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन शांतेत केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.





