गणपती बाप्पाचे आगमन पावसासोबत होणार; IMDकडून अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert | यंदाचा गणेश चतुर्थीचा सण आज (शनिवार ७ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वत्र तुफान तयारी सुरू आहे. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. यातच आता शनिवारी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले
काही जिल्ह्यांना ऑरेज किंवा यलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गडचिरोली, वाशिम, यवतमाळ तसेच आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार आहे. दुसरीकडे मुंबईसह पुणे शहराला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट दिला असून पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather Alert |
पुणे आणि साताऱ्यामध्ये पावसाचा अंदाज
पुणे आणि साताऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच नाशिक, सांगली कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईमध्ये आज ढगाळ हवामान राहील. तसेच काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Maharashtra Weather Alert |
हेही वाचा :
#Horoscope 07 September 2024 : आजचे भविष्य ( 07 सप्टेंबर 2024 )





