गणपती बाप्पा मोरया! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास व्हिडिओ शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Ganesh Festival 2024 | लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जात आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गणेश चतुर्थीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे की, “सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!” पंतप्रधानांनी यासोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले की, गणेशजी विघ्नहर्ता आहेत, ते देशवासीयांच्या अडथळ्यांचा पराभव करतील. गणेशोत्सवासोबत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, असे यात ते म्हणत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी पुणे, मुंबईमधील गणेशोत्सवातील मिरवणुका दाखवल्या आहेत. Ganesh Festival 2024 |
समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/is3Jvnygju
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट केले, “गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. देशाच्या अनेक भागात सामूहिक उत्साहाने साजरा होणारा हा सण सामाजिक ऊर्जेचे सुंदर उदाहरण सादर करतो. आपल्या परंपरेत भगवान श्री गणेश हा शुभ आणि अडथळे दूर करणारा मानला जातो. आपल्या परंपरेत भगवान श्री गणेशाला शुभ आणि विघ्न दूर करणारे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर, मी देवाला प्रार्थना करते, की सर्वांचे संकटांपासून रक्षण करो आणि समृद्धी देवो, गणपती बाप्पा मोरया!”
दरम्यान, आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. यंदाचा गणेश चतुर्थीचा सण आज (शनिवार ७ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाची तुफान तयारी सुरू आहे. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळते. Ganesh Festival 2024 |
हेही वाचा :
मोरया रे बाप्पा मोरया रे..! बाप्पाला मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात ? जाणून घ्या काय आहे,’पौराणिक कथा’





