78 Gallantry awards : देशातील ७८ शूरवीरांना शौर्य पुरस्कार जाहीर; १३ शहिदांचा मरणोत्तर सन्मान
पुरस्कारांनी देशातील संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील ७८ शूरवीरांना गौरवले जाईल. त्यातील १३ शहिदांचा मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.

78 Gallantry awards – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांवर शिक्कामोर्तब केले. त्या पुरस्कारांनी देशातील संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील ७८ शूरवीरांना गौरवले जाईल. त्यातील १३ शहिदांचा मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
जाहीर शौर्य पुरस्कारांमध्ये ९ किर्ती चक्र आणि १९ शौर्य चक्रांचा समावेश आहे. अशोक चक्रनंतर शांतता काळातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार किर्ती चक्र आहे. तर, शौर्य चक्र तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. लेफ्टनंट कर्नल मनोज फ्रान्सिस आणि मेजर जितेंद्र राठी यांना किर्ती चक्रने गौरवण्यात येईल.
त्या पुरस्काराने हवालदार गजेंद्र सिंह, हेड कॉन्स्टेबल्स जगबिर सिंग आणि बशिर अहमद, कॉन्स्टेबल्स जसवंत सिंग, बलविंदर सिंग आणि तारिक हुसेन तसेच निरीक्षक सुनील कुमार यांचा मरणोत्तर सन्मान केला जाईल.
मेजर परमवीर, मेजर तरूण वासुदेवन, मेजर केशव कुमार, मेजर गौरवसिंह ब्रिजवाल, मेजर विपीन कुमार, नायब सुभेदार शंकर राम, नायब सुभेदार डब्बालसिंह बिश्त यांना शौर्य चक्रने सन्मानित केले जाईल.





