Pune District : गायकवाड यांच्या बैलगाडाने पटकावला आमदार केसरी चषक

पुणे : माजी राज्यमंत्री तथा पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे शनिवारी (दि. 21) बैलगाडा शर्यतीत प्रमिला माणिक गायकवाड (मधुरा फॉर्म चिंचाळे) यांच्या बैलगाडाने प्रथम क्रमांक पटकावत आमदार केसरी चषक मिळविला.
पै. अमोलदादा गायकवाड (वडकी) व महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांच्या ग्रुपने द्वितीय तर मोरया प्रसन्न सिया समीर शेख वाडकर (दरेवाडी) व अजित जगदाळे (मोरगाव सहकारी) यांच्या बैलगाडाने तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेचे आयोजन सासवड शहर शिवसेना युवक प्रमुख मिलिंद इनामके, शिवसेना तालुका कार्याध्यक्ष मंगेश भिंताडे, पुणे जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख अविनाश बडदे आदींनी केले होते.
यावेळी पुणे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, माजी नगरसेवक सचिन भोंगळे, डॉ. राजेश दळवी, राजेंद्र झेंडे, सागर मोडक, पंडीत मोडक, नवनाथ गायकवाड, दत्ता काळे, रमेश इंगळे, उमेश गायकवाड, अमित झेंडे, पप्पू म्हेत्रे, नितीन कुंजीर आदी उपस्थित होते.
पुरंदर-हवेलीमधील सर्व बैलगाडा शर्यतीच्या गाडाचालकांना विमा संरक्षण दिले जाईल. अधिवेशन सुरू असल्यामुळे बैलगाडी स्पर्धेला येता आले नाही याची खंत व्यक्त करत आमदार विजय शिवतारे यांनी दूरध्वनीवरून उपस्थित सर्व बैलगाडा मालक व बैलगाडी शौकीन यांना शुभेच्छा दिल्या.
सासवड (ता. पुरंदर) : येथे बैलगाडा शर्यतीतील एक क्षण.





