Gadhavach Lagn 2 : गंगी परत येतेय.! गाढवाचं लग्न पुन्हा लागणार; राजर्षी लांडगेचा मोठा खुलासा

Gadhavach Lagn 2 : मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवणारा आणि ग्रामीण विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘गाढवाचं लग्न’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गंगी’ ही लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राजर्षी लांडगे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सिक्वेलबाबत मोठी माहिती दिली आहे.
मुलाखतीत केली मोठी घोषणा :
राजर्षी लांडगे हिने एका खास मुलाखतीत सांगितले की, “हो, गाढवाचं लग्न 2 येतोय. स्क्रिप्टवर काम सुरू आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा गंगीच्या माध्यमातून हसवायचं ठरवलंय.” या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद :
‘गाढवाचं लग्न’ हा सिनेमा ग्रामीण कथानक, मिश्कील संवाद आणि आगळ्या-वेगळ्या नावामुळे विशेष गाजला होता. गंगी हे पात्र विशेष लोकप्रिय झालं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि ग्रामीण महाराष्ट्रात विशेष गर्दी खेचली होती.
‘गाढवाचं लग्न 2’ ची जोरदार तयारी :
राजर्षी लांडगेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली असून लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. सध्या स्क्रिप्ट आणि कास्टिंगवर काम सुरू आहे. अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या बातमीनंतर प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, “गाढवाचं लग्न झालं… पण पुढे काय होणार?”





