नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास अंदाजात ‘सेल्फी’

G-7 Summit । पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ परिषदेनिमित्ताने इटलीला गेले होते. नुकतेच ते भारतात परतले आहे. यादरम्यान मोदी यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांचे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, जी-७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील नियमित उच्चस्तरीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
PM Narendra Modi and Italy’s PM Giorgia Meloni’s selfie on the sidelines of the G7 summit, in Italy. pic.twitter.com/wE1ihPHzeq
— ANI (@ANI) June 15, 2024
G-7 Summit । दोन्ही नेत्यांची अनौपचारिक भेट चर्चेत
G-7 शिखर परिषदेनंतर पीएम मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये जॉर्जिया मेलोनी पीएम मोदींसोबत सेल्फी घेत आहे. दोन्ही जागतिक नेते एकमेकांच्या पाठीशी आरामात उभे आहेत आणि हसत आहेत. हा सेल्फी जी-७ परिषदेच्या बाहेरील असल्याचे दिसते. कारण, त्या सेल्फी घेताना मागे एक दरवाजा आहे आणि तिथे एक-दोन लोकही दिसत आहे. या सेल्फीमध्ये जॉर्जिया मिलोनी आणि नरेंद्र मोदी यांचा खास अंदाज पाहण्यासारखा आहे.
G-7 Summit । मोदींनी केले हात जोडून अभिवादन
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची जॉर्जिया मेलोनीसोबत झालेली भेट खूपच खास होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेनुसार जॉर्जिया मेलोनीला हात जोडून अभिवादन केले. यानंतर इटलीच्या पंतप्रधानांनीही त्याच पद्धतीने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. सध्या यादरम्यानच्या सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





