खासदार होताच वादात युसूफ पठाण वादाच्या भोवऱ्यात अडकले ; काय आहे नेमकं प्रकरण वाचा ?

Yusuf Pathan । लोकसभा निवडणुकीत पहिल्या प्रयत्नात खासदार बनलेले माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बहरामपूरचे टीएमसी खासदार युसूफ पठाण हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांना गुजरातमधील भाजपशासित वडोदरा महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. वडोदरा महानगरपालिकेने एका भूखंडावरील कथित अतिक्रमणाबाबत ही नोटीस जारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाबाबत शहर नियमानुसार हे भूखंड त्यांचेच असल्याचे सांगतात. वडोदरा महानगरपालिकेने ६ जून रोजी नोटीस दिली होती, मात्र गुरुवारी त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
माजी नगरसेवक विजय पवार यांनी केले आरोप Yusuf Pathan ।
या प्रकरणाबाबत विजय पवार यांनी माहिती देताना, “मला युसूफ पठाण यांच्याशी कोणतीही अडचण नाही, मात्र टीपी 22 अंतर्गत तांदळजा परिसरात व्हीएमसीचा एक निवासी भूखंड आहे. युसूफ पठाण यांनी 2012 मध्ये या भूखंडाची मागणी केली होती, कारण हा भूखंड त्यांच्या घराला लागूनच आहे. ते विकत घेण्यासाठी 57,000 रुपये प्रति चौरस मीटर देऊ केले.
ते पुढे म्हणाले, ‘तेव्हा व्हीएमसीने हा प्रस्ताव मंजूर केला होता आणि तो सर्वसाधारण सभेतही मंजूर झाला होता, परंतु अशा बाबतीत अंतिम अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यांच्याकडून कोणतीही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मात्र, त्यावेळी व्हीएमसीने भूखंडाला वेढा घातला नव्हता. त्यासोबतच ‘मला आता समजले आहे की, युसूफ पठाण याने भूखंडाभोवती कंपाउंड वॉल बांधून अतिक्रमण केले आहे. या कारणास्तव मी महापालिकेला चौकशी करण्यास सांगितले आहे.
‘जमीन परत घेणार’ Yusuf Pathan ।
याबाबत व्हीएमसी स्थायी समिती अध्यक्षा शीतल मिस्त्री म्हणाल्या, आम्ही नोटीस बजावली आहे. आम्ही काही काळ थांबू आणि नंतर कारवाई करू. ही जमीन व्हीएमसीची असून ती आम्ही परत घेऊ.





