शालेय वाहतूकदारांसाठी लोकसहभागातून निधी उभारणार

पुणे (प्रतिनिधी) : करोना संकटामुळे पहिल्या लॉकडाऊन पासून शाळा बंद झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शालेय वाहतुकदारांना मदत करण्यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या सुमारे 300 वाहतूकदारांना आमदार पाटील यांच्या हस्ते धान्यकीटचे वाटप करण्यात आले. नगरसेविका मंजूषा नागपुरे आणि भाजप सरचिटणीस दिपक नागपूरे यांच्या मध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ आमदार पाटील म्हणाले की, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी भाजप कटीबध आहे. शालेय वाहतूकदारांची संख्या पुण्यात मोठी आहे. शाळा बंद असल्यापासून त्यांच्यासमोर आर्थिक संक़ट उभे आहे. अशा स्थितीत त्यांना वेगवेगळया मदतीची गरज असून ही मदत उभी करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जातील, जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा त्यांना पहिल्या महिन्यात भाजपकडून 1 हजार रूपयांचे सीएनजी कुपन दिली जातील या शिवाय, भविष्यात वाहतूकदारांसाठी ट्रस्ट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांच्यासाठी रोजगार तसेच त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जातील.
या कार्यक्रमास पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ श्रीपाद ढेकणे, भाजपा चे संदीप पोकळे पाटील, अभिरुची मॉल व मल्टिप्लेक्स चे सुनील भिडे, यशोधन भिडे, भगवे वादळ वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख योगेश बुऱ्हाडे, प्रथितयश असे डॉ ज्ञानेश्वर शेळके, डॉ श्रीपाद ढेकणे, भाजपा खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राज भिलारे यांनी केले




