नो झंझट! 14 डिसेंबरपासून 24 तास उपलब्ध असणार RTGS सुविधा
Updated On:

मुंबई – डिजिटल पेमेंटद्वारा व्यवहार वाढावे त्याकरिता रिझर्व्ह बॅंकेने 14 डिसेंबर पासून अहोरात्र आरटीजीएस सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्टलेस कार्ड द्वारा आता पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत.
14 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजल्यानंतर आरटीजीएस सेवा वर्षाचे सर्व दिवस अहोरात्र उपलब्ध होणार आहे. दिवसाची सुरुवात होताना आणि संपताना मर्यादित काळासाठी ही सुविधा बंद राहील. कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे आतापर्यंत दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते.
एक जानेवारी 2021 पासून या व्यवहाराची मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहाराला चालना मिळेल असे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले.





