तुमचं विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण करा केवळ 1499 रुपयांमध्ये, पाहा कुठे आहे ऑफर

विमानाने प्रवास करण्याची प्रयेकाला हौस असते. पण त्यामध्ये आर्थिक बजेट आड येत असते. आता तुमची ही अडचण नक्की दूर होऊ शकते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ? तर आज आम्ही तुम्हाला असाच एक नवीन मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किमतीत विमानाची तिकिटे खरेदी करू शकता.
लोक सहसा ऑनलाइन खरेदीसाठी फ्लिपकार्टचा मोठ्याप्रमाणात वापर करत असतात. आता याच फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला असून त्याने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.
ज्यामध्ये स्पाईस जेटच्या तिकीट बुकिंगवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या ऑफिशिअल वेबसाईटवर तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंग पर्यायावर जाल तेव्हा तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
देशांतर्गत विमान तिकिट बुकिंग फक्त रु.1499 पासून सुरु असून याशिवाय आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंगवरही मोठ्या प्रमाणात डिस्काउंट कंपनीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन तुम्ही सुद्धा एकदम कमी दरात हवाई सफारी करू शकता.




