Shikrapur : दहा गुन्ह्यांतील फरारी अटकेत
Shikrapur : दशक्रिया करुन सर्वजन पुन्हा घरी आले असता दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सात तोळ्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरी गेल्याचे समोर आले. किरण ढेरंगे यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली होती.

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एका कुटुंबीयातील दशक्रिया विधी असल्याने सर्वजण दशक्रिया गेलेले असताना चोरट्याने कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके यालायापूर्वीच अटक केली होती. गावातील मुख्य सूत्रधार व दहा गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले.
दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे (वय ३७ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा येथील किरण ढेरंगे यांच्या आजोबांचे निधन झाल्याने (दि.१८) जुलै रोजी कुटुंबीय दशक्रियासाठी गेले होते. दशक्रिया करुन सर्वजन पुन्हा घरी आले असता दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सात तोळ्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरी गेल्याचे समोर आले. किरण ढेरंगे यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली होती.
पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. दरम्यान, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करीत धनंजय घोडके (रा. कात्रज) याला ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने चोरीची कबुली देत मुद्देमाल देऊ केला. दरम्यान, किरण ढेरंगे यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपक ढेरंगे याने किरण ढेरंगे यांच्या घरातील सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून चोरी करण्याबाबत माहिती पुरवल्याचे सांगितले होते. तेव्हापासून दीपक फरार होता.
त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, हवलदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वांबर वाघमारे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे यांनी पुण्यात सापळा रचून दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे याला अटक केली आहे. पुढील तपास हवालदार श्रावण गुपचे हे करीत आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी अटक केल्या दीपक ढेरंगे याच्यावर शिक्रापूरसह लोणीकंद, लोणी काळभोर, सिंहगड रोड, चंदननगर, संगमनेर व रांजणगाव पोलीस ठाण्यांत दरोडा, खंडणी, मारहाण, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांची नोंद असून एका प्रकरणात मोक्कानुसारही कारवाई झाल्याचे देखील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.





