FSI: छोट्या भूखंडांना वाढीव एफएसआय नाही?
FSI:

रस्त्याच्या रुंदीशी चटई क्षेत्र निर्देशांक जोडल्याचा परिणाम
FSI: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत यूडीसीपीआर ही बांधकाम नियमावली लागू झाली असली, तरी ती सरसकट सर्वच भागांत लागू होणार नसल्याचे समोर आले आहे. या नियमावलीत रस्त्याच्या रुंदीशी चटई क्षेत्र निर्देशांक जोडण्यात आला असल्याने रस्त्याच्या रुंदीनुसारच बांधकाम करता येणार आहे.
प्राधिकरणाच्या हद्दीत यूडीसीपीआर लागू झाल्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीत मूळ एफएसआय, प्रीमिअम एफएसआय, टीडीआर आणि अन्सीलरीसह विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर एफएसआय वापरण्यास मिळणार आहे.
मात्र, हा वाढीव एफएसआय बांधकामांसाठी वापरताना रस्त्याची रुंदी, भूखंडाचे क्षेत्रफळ, वापराचा प्रकार, स्थानिक नियोजन आणि इतर विकास निकष यांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष जागेवर बांधकाम क्षमता निश्चित होणार आहे.
एफएसआयचा रस्त्याच्या रुंदीशी असलेला संबंधामुळे अनेक भागांत बांधकामांवर मर्यादा येणार आहे. त्यामुळे मोठ्या रुंदीचे रस्ते असलेल्या भागात अधिक बांधकाम क्षमता उपलब्ध मिळेल. मात्र, छोट्या भूखंडाला या वाढीव एफएसआयचा फारसा फायदा मिळणार नसल्याचे समोर आले आहे.





