Sindoor Tree : सिंदूर कोणत्या फळापासून बनतं? ‘या’ दोन राज्यात केली जाते लागवड; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन?

Sindoor Tree : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले होते. या भ्याड हल्ल्याचे भारतवासीयांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला होता. या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे.
आज मध्यरात्री भारतीय सैन्याने पीओकमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईट केला आहे. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हवाई हल्ल्याला अॅापरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले आहे. यानंतर सिंदूर हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.
भारतातील बहुतांश भागात लग्नानंतर महिला सिंदूर लावतात. हिंदू धर्मात, सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते.मात्र, हा सिंदूर कशापासून बनवला जातो याचा विचार कधी केलाच नसेल ? चला तर मग आपण जाणून घेऊया नेमका सिंदूर कशापासून आणि कसा बनवला जातो. महाराष्ट्राशी याच नेमकं कनेक्शन काय?
‘या’ बियांपासून सिंदूर तयार केला जातो
सिंदूराचे एक झाड असतं आणि या झाडाला इंग्रजीत कुमकुम ट्री म्हणतात. कुंकवाच्या झाडाला कामील वृक्ष असेही म्हणतात. या झाडाच्या फळाचा वापर सिंदूर बनवण्यासाठी केला जातो. या झाडाच्या बिया बारीक करून सिंदूर बनवलं जातं. एका झाडापासून जवळपास दीड किलोपर्यंत बिया तयार होतात.
याच बिया रंग तयार करण्यासाठी वापरल्या जातात. त्यात लाल रंगाचे प्रमाण जास्त असते. त्यापासून मिळणारे रंग किंवा रंगद्रव्ये सौंदर्यप्रसाधनामध्ये देखील वापरली जातात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये, याचा वापर लिपस्टिक, केसांचा रंग, नेलपॉलिश आणि सिंदूर बनवण्यासाठी केला जातो.
या राज्यात केली जाते सिंदूरची लागवड?
भारतातील दोन राज्यांमध्ये सिंदूरचे झाड सहज आढळते. महाराष्ट्रात या झाडाची लागवड केली जाते. तसेच हिमाचल प्रदेशातील काही भागात सिंदूरची लागवड देखील केली जाते. भारतीय संस्कृतीत इतके महत्त्व असलेले सिंदूरचे झाड महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात आढळते.
कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण भारताव्यतिरिक्त काही ठिकाणी या झाडाची लागवड केली जाते. कुमकुमची झाडे दक्षिण अमेरिकेत देखील आढळतात. कुमकुमच्या झाडाची उंची 20 ते 25 फूट असू शकते. सुरुवातीला या झाडाला हिरवी फळे येतात, परंतु हळूहळू या फळाचा रंग बदलून लाल होतो.
बिहार कृषी विद्यापीठात सिंदूरवर संशोधन
बिहार कृषी विद्यापीठात सिंदूरवर महत्त्वाचे संशोधन सुरू आहे. हे संशोधन नैसर्गिक, विषारी नसलेले आणि पर्यावरणपूरक सिंदूर विकसित करण्यावर लक्ष केले जात आहे. सिंथेटिक सिंदूरमध्ये आढळणारी रसायने आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे, शास्त्रज्ञांचे मत आहे. हे लक्षात घेऊन, या प्रकल्पात नैसर्गिक सिंदूरचा रंग स्थिर राहील, शेल्फ-लाइफ वाढेल आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल अशा निष्कर्षण, स्थिरीकरण आणि फॉर्म्युलेशन तंत्रांचा वापर केला आहे.





