आजपासून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार ; ‘या’ ८ गोष्टींमध्ये होणार बदल

नवी दिल्ली : जुलै महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित 8 बदलही पाहायला मिळाले आहेत. मग त्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते अगदी बँकेच्या धोरणांपर्यंत अनेक बदल झाले आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर पडताना दिसू न येणार आहे.
आजपासून होणाऱ्या ८ बदलांमध्ये परदेशातील क्रेडिट कार्डचा खर्च TCS च्या कक्षेत आणण्याचा नवा नियम लागू झाला आहे. याचा अर्थ असा की 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20% पर्यंत TCS शुल्क आकारले जाईल. म्हणजेच परदेशात क्रेडिट कार्डवर 7 लाख किंवा त्यापेक्षा कमी खर्च केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास प्रत्येक व्यवहारावर 20 टक्के शुल्क आकारले जाईल.
तर HDFC बँक आणि HDFC चे विलीनीकरण 1 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून होणार आहे. एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी जाहीर केल्याप्रमाणे एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही वित्तीय कंपन्या, त्यांचे भागधारक, ग्राहक आणि एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला आहे.
सध्या मुदत ठेव अर्थात एफडीला जास्त महत्त्व दिले जात आहे. सर्व बँका यावर ग्राहकांना चांगले व्याज देत आहेत. 1 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून, RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सवर अधिक व्याज देणार आहे. सध्या 7.35 टक्के दराने व्याज दिले जात असून ते 1 जुलैपासून 8.05 टक्के केले जाऊ शकते. हे दर 6 महिन्यांनी बदलत राहतात.
1 जुलै 2023 पासून देशभरात निकृष्ट दर्जाच्या पादत्राणांचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशभरात गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्याची घोषणा केली आहे, जी 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आली आहे. यानंतर, सर्व फुटवेअर कंपन्यांनी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे नियम पाळणे आवश्यक असेल.
महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल दिसून येतो. यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली होती आणि त्याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी झाली होती. मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
IGL च्या वेबसाईटनुसार CNG आणि PNG च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती एप्रिलमध्येच लागू राहतील. आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये दिल्लीत सीएनजीची किंमत 73.59 रुपये होती, जी अजूनही तशीच आहे. दुसरीकडे, पाइप नैसर्गिक वायूची किंमत 48.59 प्रति CSM आहे, ज्यामध्ये शेवटचा बदल 9 एप्रिल रोजी दिसून आला.
प्रत्येक करदात्याने त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जुलैमध्ये जवळ येत आहे. तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल तर 31 जुलैपर्यंत पूर्ण करा. जर कोणी 30 जूनपर्यंत त्यांचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर 1 जुलैपासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याचा अर्थ तो बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. आगामी काळात त्याच्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. या सर्व बदलांचे परिणाम हे सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.




