‘इक्बाल मिर्ची’ ते ‘Porn App प्रकरण’ ही आहे, राज कुंद्राच्या गुन्हेगारी प्रकरणांची यादी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. पॉर्न फिल्म्स निर्मितीप्रकरणी प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. सोमवार दि १९ जुलै २०२१ ला दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
मात्र राज कुंद्रा याला यापूर्वी अनेक प्रकरणात यापूर्वीही ते अशाप्रकारच्या वादात सापडलेले आहेत. यातच इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,
– राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते. त्यांना हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर राजस्थान रॉयल्सचे ते सहमालक होते मात्र या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
– २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता.
– बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर ५ जून २०१८ रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते.
– २०१७ मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते.





