दिल्लीपासून, बिहार-बंगालपर्यंत जमीन हादरली; नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप

Earthquake | देशातील काही राज्यांमध्ये आज मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. दिल्ली, बिहारसह पश्चिम बंगालला भूकंपाचे हादरले बसले आहे. सकाळी ६.३५ वाजता नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून 93 किमी उत्तर-पूर्वेला होता. नेपाळमध्ये झालेल्या भूंकपाचे हादरे भारत, बांग्लादेश आणि चीनमध्ये जाणवले आहेत.
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सकाळी 6:37 वाजता भूकंपाचे धक्के सुमारे 15 सेकंद जाणवले. याशिवाय जलपाईगुडीमध्ये सकाळी 6.35 वाजता आणि त्यानंतर काही वेळातच कूचबिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अद्याप कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
EQ of M: 7.1, On: 07/01/2025 06:35:18 IST, Lat: 28.86 N, Long: 87.51 E, Depth: 10 Km, Location: Xizang.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/aHk6kS9Zcm— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 7, 2025
लोकांमध्ये भीतीचे वातावरण Earthquake |
बिहारमध्ये 6 वाजून 40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवल्याची नोंद झाली आहे. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली. समस्तीपूर, मोतिहारीसह अनेक भागात सकाळी 6.40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवले. 5 ते 10 सेकंद बिहारमध्ये भूकंपाचे हादरे जाणवत होते. भूकंप इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पळाले.
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल Earthquake |
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ लोबुचेच्या 93 किलोमीटर ईशान्येला सकाळी 6:35 वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी 6:35 वाजता आलेल्या भूकंपाने नेपाळचा बहुतांश भाग हादरला. याचा तिबेट प्रदेश तसेच नेपाळच्या पूर्व ते मध्य प्रदेशाला मोठा फटका बसला आहे.
या भूकंपाचे धक्के काठमांडूपर्यंत जाणवले. पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर काठमांडूचे लोक घराबाहेर पडले. मात्र भूकंपामुळे येथे काय आणि किती नुकसान झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Earthquake |
हेही वाचा:
Chhagan Bhujbal: ‘त्या’ कागदावर शरद पवारांनी काय लिहून दिले होते?, छगन भुजबळ म्हणाले…





