Vikrant Messi post : “पहिल्या दिवसापासून..”; विक्रांत मेस्सीने पत्नीला अनोख्या पद्धतीने दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Vikrant Messi post : विक्रांत मिस्सीने त्याची पत्नी शीतलसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
Vikrant Messi post : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवसाच्या निमित्ताने विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
विक्रांतने लग्नाचे न पाहिलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्याने पत्नीसाठी एक गोड आणि भावनिक संदेश देणारी पोस्ट लिहिली आहे. “पहिल्या दिवसापासून माझ्या A1 च्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” अशी पोस्ट विक्रांतने शेअर केली आहे. या एका वाक्यात त्याने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
विक्रांत आणि शीतल यांचे २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशात एका छोट्या आणि खाजगी समारंभात लग्न पार पडले. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. अखेर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदरामुळे हे जोडपे सर्वांचे आवडते आणि लाडके जोडपे बनले आहे. त्यांना वर्धन नावाचा मुलगा आहे. लग्नाअगोदर शीतल अभिनय क्षेत्रात काम करत होती, पण लग्नानंतर तिने या इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला आहे.
अभिनेता विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या रोमँटिक अॅक्शन थ्रिलर “ओ रोमियो” चित्रपटात तो विशेष भूमिकेत आहे. याशिवाय आगामी काळात त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यात त्याच्या महत्वाच्या भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.





