नागपूर : नागपूर कर्मभुमी असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली. त्यांच्या घरी राजकीय वारसा होता. तो त्यांना पुढे घेऊन गेला. महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेऊन आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि डीएसई बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनातील डिप्लोमा केला आहे. 1992 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि सलग दोन वेळा त्यांनी काम केले. ते भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले. विशेष म्हणजे, मेयर इन कौन्सिल म्हणून पुन्हा निवडून आलेले ते एकमेव व्यक्ती होते. देवेंद्र फडणवीस सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भाजपच्या अंतर्गत, फडणवीस वॉर्ड संयोजक ते भाजप महाराष्ट्र अध्यक्ष बनले. 2020-21 मध्ये केरळ राज्य प्रभारी आणि केरळ, बिहार आणि गोवा निवडणूक प्रभारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाराष्ट्रातील ऐतिहासिक 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व फडणवीस यांनी केले. त्यांनी विधिमंडळाच्या विविध विषय समित्या, स्थायी समित्या आणि संयुक्त निवड समित्यांवर काम केले आहे. त्यांना कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे. राजकीय जीवनातील महत्वाचे टप्पे 2022: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019: 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले. मात्र तीन दिवसांनी त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. 2019: नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. 2014: फडणवीस यांनी त्यांची नागपूर दक्षिण पश्चिम जागा कायम ठेवली.भाजपच्या विजयानंतर, फडणवीस यांनी भाजपच्या वतीने 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2013: फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2010: महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती. 2004 : फडणवीस यांनी नागपूर पश्चिममधून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार देशमुख रणजितबाबू यांचा पराभव केला. 2001: देवेंद्र फडणवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. 1999: ते नागपूर पश्चिममधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1997 : नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी नियुक्ती 1992: वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर