French Open 2025 : जोकोविचचा फ्रेंच ओपनमध्ये दारुण पराभव: यानिक सिनरची अंतिम फेरीत धडक

French Open 2025 Novak Djokovic suffers a surprising defeat : फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचचा यानिक सिनरने पराभव केला. उपांत्य फेरीत जोकोविच पूर्णपणे लयीत नसल्याचे दिसून आले आणि तो प्रतिस्पर्ध्याला आव्हान देऊ शकला नाही. या पराभवामुळे, फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंगले आणि सिनरने अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्याचा सामना उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल.
जोकोविचने खराब कामगिरी केली –
नोव्हाक जोकोविचने उपांत्य फेरीचा पहिला सेट ६-४ ने गमावला. त्यानंतर, त्याने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु यानिक सिन्नरने येथेही बाजी मारत ७-५ ने जिंकला. यानंतर, तिसऱ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. येथेही जोकोविच ७-६ (७-३) ने हरला. त्याने सेटसह सामना गमावला. टायब्रेकरमध्ये, जो खेळाडू प्रथम ७ गुणांपर्यंत पोहोचतो तो सेट जिंकतो.
सामना गमावल्यानंतर जोकोविच झाला निराश –
French Open: No. 1 & 2 will fight for championships in men & women singles category.
7th June: 6:30 PM IST:
Women: Aryna Sabalenka vs Coco Gauff
8th June:
Men: Jannik Sinner vs Carlos Alcaraz#FrenchOpen #CarlosAlcaraz #JannikSinner #ArynaSabalenka #CocoGauff #RolandGarros pic.twitter.com/ZSd4lKJRK7— बातम्या खेळांच्या (@Surendra21286) June 7, 2025
नोव्हाक जोकोविच हा पुरूष एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. पण फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तो सिनेरच्या अचूकतेचा आणि वेगवान फोरहँडचा सामना करू शकला नाही. सामना गमावल्यानंतर जोकोविच निराश दिसत होता. तो भावनिकही झाला आणि म्हणाला की हा फ्रेंच ओपनमधील त्याचा शेवटचा सामना देखील असू शकतो. पराभवानंतर त्याने हाताचे चुंबन घेतले आणि नंतर तो मातीवर ठेवला.
हेही वाचा – Bengaluru Stampede : विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल! बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी धरले जबाबदार
अंतिम सामना दोन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होईल: जोकोविच
नोव्हाक जोकोविच म्हणाला की, मला सतत दबाव जाणवत होता. सिनर सतत लाईनवर उभा राहून माझा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच तो जगात नंबर १ आहे. अंतिम सामन्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. मला वाटते की त्याच्या आणि कार्लोसमधील हा सामना एक अद्भुत सामना असणार आहे, जे सध्याचे दोन सर्वोत्तम खेळाडू आहेत.





