Pimpri : काळेवाडीत महिलांसाठी मोफत योगा क्लास
Updated On:

पिंपरी : दैनंदिन कामकाज व कौटुंबिक जबाबदारीमुळे अनेक महिलांचे स्वताकडे व स्वताच्या शरीराकडे कायमच दुर्लक्ष होत आहे. त्यांमुळे शारीरिक व मानसिक सुदृढ राहण्यासाठी योग हा एकमेव उपाय असल्याने महिलांना मोफत योगा करता यावा, यासाठी काळेवाडीत मोफत योगा क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपशहराध्यक्षा अश्विनी तापकीर यांनी दिली.
याबाबत तापकीर यांनी सांगितले की, खास महिलांसाठी मोफत योगाचे आयोजन करून महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुक महिलांनी नाव नोंदणीसाठी तापकीरनगर, बेबीज शाळेजवळील जनसंपर्क कार्यालयात (९७६६६०५६२२) संपर्क साधावा.
या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आधारकार्ड कलर झेरॉक्स, १ फोटो आवश्यक असून १८ ते ६० वयोगटातील महिला सहभागी होवू शकतील. हा योगा क्लासचा कालावधी अडीच महिने असणार आहे.





