पुणे : नगरसेवक मारुती तुपे यांच्या पुढाकाराने घरेलू कामगारांसाठी मोफत करोना लसीकरण

हडपसर: पुणे महानगरपालिका धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व मारुती तुपे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हडपसर प्रभाग क्रमांक २३ मधील घरेलू कामगारांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली . घरेलू कामगारांना लसीकरण नोंदणीसाठी अडचणी येत आहे, असे लक्षात येता नगरसेवक मारुती तुपे यांच्या संकल्पनेतून घरेलू कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी २०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
याप्रसंगी नाना तुपे, महेश ससाणे, अमित गायकवाड,काका राऊत, ओंकार तुपे, कुणाल चौरे , ओंकार ससाणे, निलेश ससाणे, संजय हिंगणे , ऋषिकेश जगताप, अनिल जगताप, विकी मांडे, विकास तावरे, संदीप रावडे, आशिष मोदी,राजू महाडिक, रोहन महाडिक,देवराज महाडिक,प्रसाद केदारी,ऋषभ देशपांडे व मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान,रुद्रतेज प्रतिष्ठान, आधार प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती तुपे म्हणाले की, घरेलू कामगारांसाठी स्मार्ट फोन नाही, ओळखपत्र नाही, ऑनलाइन नोंदणी करू शकत नाही, अशा ४०६ नागरिकांना मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे, तो दूर करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी लसीकरणाविषयी कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नये. करोना महामारीला हद्दपार करण्यासाठी कोविड लस घ्यावी, असे आवाहन नागरिकांना त्यांनी केले.





