Vijaystambha Day Koregaon Bhima : विजयस्तंभ दिनानिमित्ताने PMPML कडून मोफत बससेवा

पुणेः दि. १ जानेवारी २०२५ रोजी कोरेगावभीमा येथे विजयस्तंभदिनी अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल होणार असल्याने पीएमपीएमएलने मोफत बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनुयायांना सुलभरित्या प्रवास करता येणार आहे. मंगळवार दि. ३१ डिसेंबर या दिवशी दुपारी चार वाजल्यापासून बुधवार दि. १ जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही मोफत बससेवा सुरू राहणार असल्याची माहिती पीएमपीएमएलने दिली आहे. लोणींकद आणि शिक्रापूर या विभागातून विविध मार्गांवरून या बस धावणार आहेत.
लोणीकंद विभागामार्फेत मंगळवारी दुपारी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत ७५ मोफत बस सोडण्यात येणार आहेत. तर रात्री बारा वाजेपर्यंत २५० बस याच मार्गांवरून जाणार आहेत. कोरेगावाभीमा येथे अभिवादनाच्या कार्यक्रमाला राज्यातून देशातून आणि परदेशातूनही अनुयायी हजेरी लावतात. यामुळे पीएपीएमपीलने यंदाही मोफत बससेवा देण्याचा निर्णय घेतल्याने अनुयायांचा प्रवास सुलभ होणार आहे. शिक्रापूर विभागातून कोरेगावभीमा येथे मंगळावारी सकाळी सात वाजल्यापासून १४० बसेस सोडण्यात येणार आहेत. तर बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत ३५० बसेस याच मार्गावरून जाणार आहेत.
जादा बसेस
या सोहळ्यासाठी शहरातील विविध बसस्थानकावरून एकूण ७५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे स्थानक मोलेदिना बसस्थानकः ३१, मनपा भवन बसस्थानकः ३३, दापोडी मंत्री निकेतनः २, ढोले पाटील रस्ता मनपा शाळाः२, अप्पर डेपो बसस्थानकः ४, पिंपरी आंबेडकर चौकः ३





