UEFA Nations League | एम्बापेच्या कामगिरीने फ्रान्सला विजेतेपद
Updated On:

मिलान -किलियान एम्बापेने अखेरची 10 मिनिटे शिल्लक असताना केलेल्या निर्णायक गोलमुळे जगज्जेत्या फ्रान्सने अंतिम सामन्यात स्पेनचा 2-1 असा पराभव करत नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसरा हाफ सुरू झाल्यावर मात्र, एम्बापेने आक्रमक खेळ करत स्पेनवर वर्चस्व राखले.
हा सामना संपण्यासाठी केवळ 10 मिनिटे बाकी असताना 64 व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र, ही आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. अनुभवी करीम बेन्झेमाने उत्कृष्ट गोल केल्यामुळे फ्रान्सने 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला थिओ हर्नाडेझच्या पासवर एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.





