बामको (माली) – मालीमध्ये इस्लामी कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 14 सैनिक ठार झाले आहेत. तर डझनभर अन्य सैनिक जखमी झाले आहेत. मालीतील सैन्यदलाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. दिया आणि दियाफार्बे या गावांदरम्यान अनेक “आयईडी’चे एकाचवेळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. याशिवाय मालीच्या मध्य भागातील कौमारा आणि मासिना या गावांजवळही असेच “आयईडी’चे स्फोट घडवून आणण्यात आले होते, असे सैन्यदलाच्या जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्लामी दहशतवाद्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला हा हिंसाचार घडवून आणला होता. त्यापूर्वी मालीच्या सैन्यदलाने केलेल्या कारवाईमध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/there-will-be-no-third-world-war-it-is-not-a-trilogy-zelenskyy-at-golden-globes-speech/ आफ्रिकेच्या पश्चिमेकडील मालीमध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या संघटनांकडून गेल्या दशकभरापासून अधिक काळापासून हिंसाचार केला जात आहे. या हिंसाचारात हजारो लोक ठार झाले आहेत. मालीतील हिंसाचार रोखण्यासाठी फ्रान्सचे सैन्य तेथे तैनात होते. 2020 मध्ये हे सैन्य माघारी गेल्यापासून या हिंसाचारातही वाढ झाली आहे.