Wai municipal elections: वाई नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत: नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट; २२ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

वाई (कुमार पवार) : वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीचा शेवटचा दिवस संपताच राजकीय चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदाची लढत चौरंगी होणार आहे. तर नगरसेवकांच्या २२ जागांसाठी तब्बल ६१ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांचा एक उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला असून उर्वरित २२ जागांवरही या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाने १८, शिवसेना (शिंदे गट) यांनी ७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी ५, काँग्रेसने १, तर ८ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवत आहेत.
प्रभागामध्ये अशा हाेणार लढती :
प्रभाग क्रमांक १ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) १) अपर्णा संताेष जमदाडे (भारतीय जनता पार्टी), २) सविता दिलीप हगीर (राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी अजितदादा गट) दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. १ ब (सर्वसाधारण) १) प्रसाद कृष्णराज बनकर (भारतीय जनता पार्टी), २) माया सुनील चौधरी (शिवसेना), ३) संदीप रघुनाथ नायकवडी (राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी अजितदादा गट) अशी तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. २ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) १) ज्ञानेश्वर दत्तात्रय सूर्यवंशी (भारतीय जनता पार्टी), २) घनश्याम सखाराम चक्के (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) यांच्यात थेट दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. २ ब (सर्वसाधारण-महिला) १) पद्मा संग्राम जाधव (भारतीय जनता पार्टी), २) सुप्रिया महेंद्र धनवे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) अशी दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ३ अ (अनुसूचित जाती) १) राकेश राजन मोरे (अपक्ष), २) विपिन नारायण वैराट (भारतीय जनता पार्टी), ३) सतीश विनायक वैराट (शिवसेना), ४) संदीप ईश्वर जावळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) यांच्यात चाैरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ३ ब (सर्वसाधारण – महिला) १) शबाना कपूर मुजावर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट), २) मीनाक्षी विजय जमदाडे (भारतीय जनता पार्टी), ३) जिवीता अतुल जमदाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) तीरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ४ अ (अनुसूचित जाती – महिला) १) छाया राजेंद्र सदाफुले (भारतीय जनता पार्टी), २) शारदा महेश काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ३) तृप्ती विकी सकटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट) येथे ही तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ४ ब (सर्वसाधारण) १) कृष्णा जनार्दन भगत (शिवसेना), २) केदार विवेक काटे (भारतीय जनता पार्टी), ३) संग्राम दादासाहेब पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ५ अ (सर्वसाधारण) १) स्वप्निल राजेंद्र भिलारे (भारतीय जनता पार्टी), २) भारत सदाशिव खामकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) थेट दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ५ ब (सर्वसाधारण-महिला) १) सुनिता धनंजय मलटणे (अपक्ष), २) ज्योती सचिन गांधी (भारतीय जनता पार्टी), ३) ज्योती संतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट) तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ६ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला) १) विमल प्रताप लोखंडे (शिवसेना), २) जागृती मकरंद पोरे (भारतीय जनता पार्टी), ३) रेणुका गणेश जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ६ ब (सर्वसाधारण) १) विजय वसंतराव ढेकाणे (भारतीय जनता पार्टी), २) चरण रमेश गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) थेट दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ७ अ (सर्वसाधारण) १) कुलदीप दिलीप शिंदे (भारतीय जनता पार्टी), २) शैलेंद्र सुधाकर देवकुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट) थेट दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ७ ब (सर्वसाधारण-महिला) १) विजया पांडुरंग खोपडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट), २) केतकी विजय मोरे (भारतीय जनता पार्टी) अशी दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ८ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) १) सुरेश शशिकांत देशमाने (राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदपवार गट), २) राजेंद्र शंकर देशमाने (अपक्ष), ३) अजित हरी वनारसे (भारतीय जनता पार्टी), ४) अजित बाळासाहेब शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट) अशी चाैरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. ८ ब (सर्वसाधारण-महिला) १) पदमा विष्णू पिसाळ (अपक्ष), २) पद्मश्री प्रफुल्ल चाेरगे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट) अशी दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं ९ अ (अनुसूचित जमाती-महिला) १) रेखा कांताराम जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) यांची बिनविराेध निवड झाली आहे.
प्रभाग क्रं. ९ ब (सर्वसाधारण) १) प्रदीप मारुती जायगुडे (राष्ट्रीय काँग्रेस), २) सुशील सुर्यकांत खरात (अपक्ष), ३) उमेश लक्ष्मण जायगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट), ४) प्रदीप बाळकृष्ण जायगुडे (अपक्ष), ५) निलेश लहू माेरे (शिवसेना) अशी पंचरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्रं. १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला) १) संगीता राजेश गुरव (अपक्ष), २) नीलिमा दत्तात्रय खरात (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) अशी दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्र. १० ब (सर्वसाधारण) १) योगेश आनंदराव फाळके (शिवसेना), २) संदीप रघुनाथ डोंगरे (अपक्ष), ३) गुरुप्रसाद राजू चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) अशी तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्र. ११ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) १) संग्राम सुनील सकपाळ (भारतीय जनता पार्टी), २) संतोष रामचंद्र गोंजारी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट) अशी दुरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्र. ११ ब (सर्वसाधारण-महिला) १) दिपाली निशिगंधा सावंत (भारतीय जनता पार्टी), २) उज्वला सुनील शिंगटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट), ३) मोनिका प्रकाश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट) अशी तिरंगी लढत हाेणार आहे.
प्रभाग क्र. ११ क (सर्वसाधारण-महिला) १) नूतन गिरीधर मालुसरे (भारतीय जनता पार्टी), २) अस्मिता गणेश सावंत (शिवसेना), ३) प्रीती निलेश सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट), ४) सरला नारायण सोनावणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट) अशी चाैरंगी लढत हाेणार आहे.
नगराध्यक्षपदाची चौरंगी लढत
नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार मैदानात :
अनिल सावंत — भाजप
दीपक गणपत जाधव — अपक्ष
प्रदीप मारुती जायगुडे — काँग्रेस
नितीन तानाजी कदम — राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)
या चारही उमेदवारांमुळे वाई नगराध्यक्षपदाची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.





