महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना फाशीची शिक्षा
Updated On:

लाहोर – महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिला लुबाडल्याच्या आरोपात दोषी ठरवलेल्या चौघाजणांना आज पाकिस्तानातील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. जानेवारी महिन्यात नासिर अहमद, मुहम्मद वसिम, उमर हयात आणि फकिर हुसैन हे चौघे संशयित बहावलपूर जिल्ह्यातील लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावरील एका घरात घरफोडीच्या उद्देशाने घुसले होते.
तेथे त्यांनी एका मुलीवर सामुहिक बलात्कार केला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला होता, असे सरकारी वकीलांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राणा अब्दुल हकिम यांनी बुधवारी या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली.
काही महिन्यांपूर्वी मुलतान प्रांतातील शुजाबाद येथे चार सशस्त्र चोरट्यांनी नवविवाहितेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला होता. या गुन्हेगारांना पोलीस अद्याप पकडू शकलेले नाहीत.





