जालन्यात कार विहिरीत कोसळून चौघांचा मृत्यू
Updated On:

जालना – जिल्हयातील राजूर ते टेंभूर्णी रस्त्यावर गाढेगव्हाण (तालुका-जाफराबाद) गावाच्या शिवारात कार विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वर डकले, निर्मला डकले, पद्माकर भांगिरे आणि ज्ञानेश्वर भांगिरे अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. ही कार छत्रपती संभाजीनगर येथून बुलडाणा जिल्हयातील सुलतानपूर येथे चालली होती.
सकाळी फिरण्यासाठी निघालेले भगवान साळूना बनकर (राहणार-गाढेगव्हाण, तालुका – जाफराबाद) यांना धडक देऊन ही कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या ७० फूट खोल विहिरीतील पाण्यात पडली. कारच्या धडकेमुळे भगवान बनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





