दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना पोलीस कोठडी

पुणे : महामार्गावरील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्या चौघांना 18 मे पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
गणेश शिवडकर (वय 21), सुनील गायकवाड (वय 23), तिलकसिंग टाक (वय 29), निशांत ऊर्फ ब्लॅक ननावरे (वय 24, सर्व रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या प्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 मे रोजी उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली.
पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या भारत पेट्रोलपंपावर आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी चोरीच्या कार मधून आले. पोलिसांना केलेल्या कारवाईत त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, एक कोयता, एक कटावणी, एक कटर, एक चाकू, एक कात्री, मिरचीपूड इत्यादी साहित्य मिळून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चौघांना न्यायालयात हजर करण्यात आहे.
गुन्ह्यातील इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील हत्यारे त्यांनी कोठून आणली ? त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का ? त्यांनी यापूर्वी अश्या प्रकारे दरोडा टाकला आहे का ? गुन्ह्यातील वापरलेली चोरीची कार त्यांनी कोठून आणली ? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.





