#TeamIndia : माजी यष्टीरक्षक फलंदाज पटेलची थेट मुख्य प्रशिक्षक द्रविडवर टीका
Updated On:

नवी दिल्ली :- भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने थेट भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा हा ज्या प्रमाणे संघाचा कर्णघार हार्दिक पंड्याशी सातत्याने चर्चा करत असतो, तशी चर्चा द्रविड करत नसावे, असे मतही पटेलने व्यक्त केले आहे.
पंड्या कुठे चुकत आहे, संघात काय बदल अपेक्षित आहे याबाबत नेहरा सातत्याने पंड्याशी चर्चा करत होता. तेच द्रविडकडून अपेक्षित आहे मात्र, प्रत्यक्षात ते होत नाही. पंड्याकडे संघाचे नेतृत्व असताना द्रविडने आपल्या अनुभवाचा लाभ व सल्ले देणे गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा एक काळ येत असतो की त्यावेळी बरेच निर्णय चुकतात व त्यासाठीच द्रविडसारख्यांचे सल्ले बहुमोल ठरतात, असेही पटेल म्हणाला.





