बंकुरा – पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकच्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले तृणमुल कॉंग्रेसचे माजी मंत्री शामाप्रसाद मुखर्जी यांना आज दहा कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. एका स्थानिक स्वराज्य संस्थेतील ई टेंडरिंग मध्ये सन 2020 मध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण 9 कोटी 91 लाख रूपयांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे.
या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली पण त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान भाजपनेही त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने म्हटले आहे की निवडणुकीच्या काळात ते भाजप मध्ये आले होते हे खरे आहे पण सध्या ते भाजप मध्ये सक्रिय नाहीत.