China Open 2024 : नाओमी ओसाका, सोफिया केनिनची आगेकूच…

China Open 2024 – माजी अव्वल मानांकित असलेल्या नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) इटलीच्या लुसिया ब्रोंझेट्टीला (Lucia Bronzetti) पराभूत करताना चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. नाओमीने केवळ 80 मिनिटांत 77 व्या स्थानावर असलेल्या लुसियाला 6-3, 6-2असे पराभूत केले. 2019 मध्ये येथे विजेतेपद पटकावणाऱ्या ओसाकाचा दुसऱ्या फेरीत सामना कझाकिस्तानच्या 21व्या मानांकित युलिया पुतिन्त्सेवाशी होईल.
अन्य लढतीत माजी ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती असलेल्या सोफिया केनिनने रोमानियाच्या अना बोगदानला 7-5, 6-2 असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 25 वर्षीय केनिन समोर पुढील फेरीत 12 व्या मानांकित डायना श्नायडरचे आव्हान असणार आहे.
Macau Open 2024 (Badminton) : किदाम्बी श्रीकांतसह आयुष आणि तस्नीमची विजयी सलामी….
चायना ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांचे सामने गुरुवारपासून सुरू होणार आहेत. यात अव्वल मानांकित खेळाडू यानिक सिन्नर आणि तिसरा मानांकित कार्लोस अल्काराझ हेही सहभागी होणार आहेत.





