ठाण्याच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा विरारमध्ये संशयास्पद मृत्यू

ठाणे : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉट मध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आले होते.
रिसॉर्टच्या गेटमधून गाडी नेताना एका रिक्षाचा धक्का लागून, त्यांची स्थानिकांसोबत भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनांही मारहाण झाली होती. आणि त्यानंतर मिलिंदला चक्कर आल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन झालं आहे. जमावानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा करून संबधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2), 352, 351 (2) प्रमाणे अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.





