Breaking News: राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण

पुणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून, पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.
पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश सावंत असे अपहरण झालेल्याचे नाव असून ते पुण्यात राहत असल्याची माहिती आहे.
पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या भागातून राज्याच्या माजी मंत्र्याच्या मुलाचे अपहरण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. ऋषिकेश सावंत यांचे खरेच अपहरण झाले का? त्यांचे अपहरण कुणी व कशासाठी केले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
पोलिसांचे एक पथक तानाजी सावंत यांच्या कात्रज परिसरातील निवासस्थानीही पोहोचले आहे. या निवासस्थानी कुणाचे फोन आले होते का? किंवा सावंत यांच्याकडे खंडणीसाठी कुणाचा फोन आला होता का? याची माहितीही पोलिस यंत्रणा घेत आहे.

