CSA T20 League : डर्बन फ्रॅंचायझीच्या प्रशिक्षकपदी आफ्रिकेच्या ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची नियुक्ती
Updated On:

कोलकाता – डर्बन फ्रॅंचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सीएसए टी-20 लीग स्पर्धत पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी आरपीएसजी ग्रुपने डर्बन फ्रॅंचायझीचे मालकी हक्क मिळविले असून सोमवारी फ्रॅंचायझीसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून क्लुसनरची नियुक्ती केली आहे.
क्लुसनर म्हणाला, हे माझ्यासाठी एक नवीन आव्हान आहे. यामुळे मला खूप अभिमान वाटतो. मी संघाला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, क्लुसनरने 49 कसोटी आणि 171 एकदिवसीय सामने खेळलेले आहे. तसेच यापूर्वी अफगाणिस्तान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.





