तुरुंगात असलेल्या माजी पाकिस्तानी पंतप्रधानांवर पुन्हा संकट; इम्रान खान यांना पत्नीसह 17 वर्षांचा कारावास

Imran Khan Sentenced | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश सेंट्रल शाहरुख अर्जुमंद यांनी हा निकाल दिला. हा खटला एक महागडा बुल्गारी ज्वेलरी सेट किरकोळ किमतीत खरेदी केल्याप्रकरणाशी संबंधित आहे.
‘तोशाखाना-२’ प्रकरणात रावलपिंडीच्या विशेष न्यायालयाने शनिवारी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी या दोघांनाही प्रत्येकी १७ वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली आहे.
यामध्ये आपराधिक विश्वासघात (कलम ४०९) अंतर्गत १० वर्षे कठोर कारावास आणि ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या’च्या कलम ५(२)४७ अंतर्गत ७ वर्षांचा कारावास, अशा एकूण १७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या दाम्पत्यावर १.६४ कोटी पाकिस्तानी रुपयांचा (१६.४ दशलक्ष) दंडही ठोठावला आहे. जर ही दंडाची रक्कम जमा केली नाही, तर त्यांना अधिक काळ तुरुंगात राहावे लागणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे वाढते वय आणि बुशरा बीबी यांचे महिला असणे, या दोन गोष्टी लक्षात घेत शिक्षेसंदर्भात नरमाईची भूमिका घेण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
इमरान खान अधिकृत दौऱ्यावर असताना सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सकडून एक महागडा बुल्गारी ज्वेलरी सेट त्यांना भेट म्हणून मिळाला होता. मात्र ही ज्वेलरी अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्यात आली आणि नियमांनुसार ती सार्वजनिक खात्यात जमा केली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्या सेटची खरी किंमत 7 कोटी 15 लाख होती, पण तो 58 लाखांत खरेदी करत नियमांचं उल्लंघन करण्यात आले. हा जनतेचा विश्वासघात आणि भ्रष्टाराचार असल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. हा ज्वेलरी सेट सरकारच्या ताब्यात न दिल्याने सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं, असं तपास यंत्रणांनी सांगितलं. दरम्यान, इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडियाला तुरुंगात बंद आहेत.
तोशाखाना- 2 प्रकरण काय आहे?
तोशाखाना- 2 हे प्रकरण सरकारी भेटवस्तूंच्या अफरातफरीशी संबंधित आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांना मिळालेला अत्यंत महागडा बुलगारी ज्वेलरी सेट त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नियमांचे उल्लंघन करून, अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘एफआयए’ने केला होता. ज्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. निकालानंतर, इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या कायदेशीर पथकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा:





