पाकचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी निवडणूक लढवणार नाही
Updated On:

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी हे आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाहीत. अब्बासी यांनीच स्वतः याची घोषणा केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे ज्येष्ठ नेते असलेल्या अब्बासी यांनी एका मुलाखतीदरम्यान यासंदर्भातल्या प्रश्नांना स्पष्टपणे कोणतेच उत्तर दिले नाही.
निवडणूक न लढवण्याबाबत नवाझ शरीफ यांनीच सांगितले आहे का, असे विचारले असता पक्षाचा राजीनामा देणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे या दोन्ही शक्यतांवर त्यांनी भाष्य करणे टाळले. आपल्याला तसे काहीही करण्याची काहीही गरज वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याविरोधातील तोशखाना आणि अल-कादिर प्रकरणी योग्य तो न्याय होईल. आता लगेच जरी न्याय झाला नाही, तरी ५ ते ६ वर्षात न्याय नक्कीच होईल, असेही ते म्हणाले.





