कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव येथील भाजपचे जुने कार्यकर्ते, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक सुभाषचंद्र आनंदराव शिंदे (वय 78) यांनी गृहकलहाला वैतागून मंगळवारी सकाळी शहरातील साईनगर येथील राहत्या घरात दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
ते माजी खासदार स्व. सुर्यभान वहाडणे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे खंदे समर्थक होते. सुभाषचंद्र शिंदे हे तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमात अग्रभागी असायचे. इतरांना बौध्दिक धडे देवून जीवनातील नैराश्य घालविण्याचे काम करणारे आणि संघर्षाला धाडसाने तोंड देणारे शिंदे मात्र स्वतः आत्महत्या करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांच्या आत्महत्येने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.