क्रिकेट विश्वावर शोककळा; IND vs ENG कसोटीदरम्यान भारताच्या माजी फिरकीपटूचे निधन

Dilip Doshi Passes Away during IND vs ENG Leeds Test : लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वासाठी दुखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. फिरकी गोलंदाज म्हणून दिलीप दोशी यांनी भारतासाठी 33 कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. दोशी यांच्या जवळच्या कौटुंबिक मित्राने त्यांच्या निधनाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, दोशी यांचे सोमवारी (२३ जून) लंडनमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या दोन दिवसांत क्रिकेटपटूच्या निधनाची ही दुसरी बातमी आहे. दिलीप दोशी यांच्या निधनाच्या एक दिवस आधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले होते. लॉरेन्स यांनी इंग्लंडसाठी ५ कसोटी सामने खेळले होते.
Both teams are wearing black armbands today in memory of former Indian cricketer Dilip Doshi, who passed away on Monday.
The teams also observed a minute’s silence before the start of Day 5. pic.twitter.com/1npOAo4ihp
— BCCI (@BCCI) June 24, 2025
दिलीप दोशी यांची कारकीर्द –
BCCI mourns the passing of Dilip Doshi.
More details here – https://t.co/wXYYHs6TLz pic.twitter.com/z4GMI2YBpx
— BCCI (@BCCI) June 24, 2025
भारतासाठी ३३ कसोटी सामने खेळलेले दिलीप दोशी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा पदार्पण केले होते. १९७९ ते १९८३ दरम्यान, वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी भारतासाठी पदार्पण केले होते. त्यांनी ३३ कसोटी सामन्यांत ११४ बळी घेतले आणि यात ६ वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.
हेही वाचा –IND vs ENG : लीड्स कसोटीत इंग्लंडची मोठी चूक! बेन स्टोक्ससह संघावर आयसीसी करणार कारवाई?
याशिवाय, १५ एकदिवसीय सामन्यांत त्यांनी २२ बळी मिळवले. १९६८-६९ च्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दोशी यांनी १९८६ मध्ये निवृत्ती घेईपर्यंत २३८ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ४३ वेळा पाच बळी घेत ८९८ बळी मिळवले. त्यांनी बंगाल आणि सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ वेळा १० बळी घेण्याची कामगिरी केली.
हेही वाचा – IND vs ENG : पंतचा पराक्रम आणि विवाद: लीड्स कसोटीत शतकांनंतर आयसीसीने फटकारले!
क्रिकेट जगतावर पसरली शोककळा –
बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी दिलीप दोशी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शाह म्हणाले की, हे त्यांच्यासाठी खूप वेदनादायक आणि वैयक्तिक नुकसान आहे. दिलीप हे केवळ महान क्रिकेटपटूंपैकी एक नव्हते तर सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे निर्मळ मन, प्रामाणिकपणा आणि खेळाप्रती अमूल्य समर्पण त्यांना खरोखरच खास बनवते.





